त्रिविक्रमपूजनाचे महत्त्व सांगताना दैनिक प्रत्यक्षमधील तुलसीपत्र अग्रलेख क्र. ५२० मध्ये
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू म्हणतात- ‘त्रिविक्रमाची पूजा, उपासना व कुठल्याही प्रकारची भक्ती करणे हा श्रद्धावानांना कुठल्याही पातळीवरील व कुठल्याही प्रकारचे अभाव, दैन्य व दुर्बलता दूर करण्याचा निश्चित मंगलदायी मार्ग आहे कारण
त्रिविक्रम हा स्वत: ‘सगुण’ असून नव-अंकुर-ऐश्वर्यांनी खच्चून भरलेला आहे. हा त्रिविक्रम त्याच्या भक्तांना त्यांच्या त्रिविक्रमावरील श्रद्धेच्या व विश्वासाच्या चौपट फल देत राहतो.
त्रिविक्रमाची उपासना अथवा पूजा ही केवळ ‘साकाराची’ किंवा पवित्र आकृतीची उपासना किंवा पूजा नाही, तर ती पवित्रतम व महादिव्य ‘सगुणाची’ उपासना आहे, गुणांची उपासना आहे, त्या गुणांचा लाभ घेण्यासाठी.
त्रिविक्रमाचे पूजन करून श्रद्धावान भक्त स्वत:चे जीवन तर सुखी, तृप्त, समर्थ व मंगलमय करतातच, पण त्याचबरोबर ते श्रद्धावान इतरांचेही हितच करतात. स्वत:चे हित साधताना त्रिविक्रमाच्या भक्तांकडून कधीही इतरांना विनाकारण पीडा होत नाही, त्रिविक्रमभक्तांची नीति सदैव दृढ राहते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्रिविक्रमाचा उपासक हा आपोआप आदिमाता चण्डिका जगदंबेचा उपासक असतोच.
अकारण कारुण्य, क्षमा व भक्तीचा स्वीकार हीच आद्य तीन पावले असणारा हा त्रिविक्रम त्याच्या श्रद्धावानाच्या सुखी व समर्थ जीवनाची मंगलमय आकृती घडवतो. हा त्रिविक्रम म्हणजे ह्या त्रिमितीतील (थ्री-डायमेन्शनल) जगात केवळ श्रद्धावानांसाठीच असणारा त्रिविध आधार आहे.’ (संदर्भ- तुलसीपत्र अग्रलेख क्र. ५२०)
दैनिक प्रत्यक्षमधील तुलसीपत्र १४८३ मध्ये सद्गुरु श्री अनिरुद्ध लिहितात -
‘खरोखरच त्रिविक्रमाचा स्पर्श ज्याच्या बुद्धिला, मनाला किंवा तनुला एकदा तरी झाला आणि त्या व्यक्तिने तो भावस्पर्श भक्तीने किंवा पश्चात्तापाने किंवा चूक सुधारून स्वीकारला की त्या भक्ताचं जीवन म्हणजे सौंदर्याची खाणच बनते.’
अशा या त्रिविक्रमाच्या तीन पावलंचे पूजन गुरुपौर्णिमेस श्रद्धावान करतात.
श्रीत्रिविक्रम पूजन -
महत्त्वाकांक्षांची भरारी, पुरुषार्थ आणि वास्तवाचे भान ही त्रिसूत्री उचित रित्या सांभाळणारी व्यक्तीच
यशस्वी होऊ शकते, यश पचवू शकते आणि यशाचा सुखाने उपभोगही घेऊ शकते.
त्रिविक्रम स्वत:च्या तीन पदन्यासांमध्ये (अकारण कारुण्य, क्षमा आणि अनन्यभक्तीची स्वीकृति)
अनन्यशरण असणार्या त्या श्रद्धावानाचे दुष्प्रारब्ध नष्ट करून त्याच्या जीवनात आनन्दवन फुलवतो.
(तुलसीपत्र अग्रलेख क्रमांक ५१९) श्रद्धावान गुरुपौर्णिमेला श्री त्रिविक्रमाचे दर्शन घेतात, त्याची प्रार्थना
करून त्याला आपल्या जीवनात येण्यासाठी आवाहन करतात. आमच्या आयुष्यात सदैव ‘गुरुपौर्णिमा ’
रहावी या भावाने श्रद्धावान गुरुपौर्णिमेस स्वेच्छेने त्रिविक्रमाचे पूजन करतात.