शुक्रवार, २२ जून, २०१८

संस्थेचा गुरुपौर्णिमा उत्सव


सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट, श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन आणि सलग्न संस्थेतर्फे दरवर्षी ‘गुरुपौर्णिमा’ उत्सवपर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. यामध्ये लाखो श्रद्धावान सहभागी होतात. संस्थेतर्फे पहिला गुरुपौर्णिमा उत्सव १९९६ साली दादर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता व त्यानंतर दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो.

 या उत्सवाची सुरुवात सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या (बापू) घरातील गुरुपादुकांच्या अर्थात श्रीनृसिंहसरस्वतींच्या पादुकांच्या आगमनाने होते. याबराबेर सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या देवघरातील श्रीगुरुदत्तात्रेयांची मूर्ती उत्सवस्थळी आणली जाते. श्रीनृसिंहसरस्वतींच्या पादुकांचे उत्सवस्थळी षोडश पुजन होते. त्यावर जलाभिषेक केला जातो. त्यानंतर या पादुकांच्या दर्शनाचा लाभ श्रद्धवानांना लुटता येतो. गुरुगीतेत सद्गुरुंचे चरणकमल सकलतीर्थमय असल्याचा उल्लेख येतो. त्यामुळे  श्रीनृसिंहसरस्वतींच्या पादुकांवर होणार्या जल-अभिषेकातील जल नंतर तीर्थ म्हणून श्रद्धवानांना दिले जाते. 

तसेच श्रीगुरुदत्तात्रेयांच्या मूर्तीसमोर ‘ॐ द्रां दत्तात्रेयाय नम:|’ या मन्त्राचे अखंड पठण होते. (’द्राम्’ हा श्रीगुरु दत्तात्रेयांचा बीजमन्त्र आहे. दत्तमालामंत्रात ’द्राम्’ बीजाचा उल्लेख आहे.)

याशिवाय उत्सवस्थळी मूळ सद्गुरुतत्वस्वरूप स्वयंभगवान श्री त्रिविक्रमाचे  पूजन केले जाते. 


1 टिप्पणी: