‘एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरू ऐसा।’
भारतीय संस्कृतीत ‘गुरुपौर्णिमा’ उत्सवाला अन्यनसाधारण महत्त्व आहे. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला हे पर्व भारताच्या कानाकोपर्यात साजरे केले जाते. याच दिवशी आदिगुरु वेदव्यासांचा जन्म झाला होता. त्यामुळे ह्या दिवसाला ‘व्यासपौर्णिमा’ही म्हणतात. सद्गुरुंच्या ऋणांचे आणि त्यांच्या निरपेक्ष प्रेमाचे स्मरण करून ‘सद्गुरुंची सत्ता आपल्या आयुष्यात अखंड रहावी’ या भावातून सद्गुरुंना वंदन करून, त्यांचे पूजन करून हा उत्सव साजरा केला जातो.
या उत्सवाची परंपरा भारतात कशी सुरू झाली याची एक सुंदर कथा सांगितली जाते. अठरा पुराणे, महाभारतासारखे महाकाव्य लिहूनसुद्धा महर्षि वेदव्यासांचे तृप्त आणि समाधानी नव्हते. त्यांचे चित्त अशांत होते. अशा वेळी महर्षि वेदव्यासांचे गुरू नारदमुनी यांनी त्यांना दर्शन दिले आणि त्यांना श्रीकृष्णाच्या गुणसंकीर्तन करणार्या ग्रंथाची रचना करण्याची आज्ञा केली. महर्षि व्यासांनी ही आज्ञा शिरोधार्य मानून त्याचे तंतोतंत पालन केले व त्यांना गुरुवचनाची विलक्षण अनुभूती आली. ‘गुरुंचे आज्ञापालन केल्यानेच शांती, तृप्ती व समाधान मिळते. त्यांची आज्ञा हाच माझा संकल्प असे जेव्हा मी मानतो व त्याप्रमाणे जगतो तेव्हाच हा नरजन्म सार्थकी लागतो’ हा बोध व्यासमहर्षिंच्या या कथेने आम्हाला दिला. महर्षि वेदव्यासांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा’ अवघ्या भारतात साजरी करण्याची परंपरा सुरू झाल्याची ही कथा आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा