‘खरोखरच त्रिविक्रमाचा स्पर्श ज्याच्या बुद्धिला, मनाला किंवा तनुला एकदा तरी झाला आणि त्या व्यक्तिने तो भावस्पर्श भक्तीने किंवा पश्चात्तापाने किंवा चूक सुधारून स्वीकारला की त्या भक्ताचं जीवन म्हणजे सौंदर्याची खाणच बनते.’, असे बापू दैनिक प्रत्यक्षमधील तुलसीपत्र १४८३ मध्ये स्पष्ट उल्लेख करतात.
‘श्रद्धवानांच्या जीवनात येणार्या संकटांच्या वेळी मूळ सद्गुरुतत्व अर्थात त्रिविक्रम श्रद्धवानाला आपल्याशी बांधून ठेवतो आणि खऱ्या श्रद्धवानाला कोणत्याही संकटातून दूर करतो. त्रिविक्रम कोणत्या मार्गाने श्रद्धवानाचे सहाय्य करतो, याची कल्पनाही श्रद्धवानाला येऊ शकत नाही, असे मूळ सद्गुरुतत्व असलेल्या त्रिविक्रमाबद्दल बापूंनी तुलसीपत्र १४६४ मध्ये लिहले आहे.
‘त्रिविक्रमाची पूजा, उपासना व कुठल्याही प्रकारची भक्ती करणे हा श्रद्धावानांना कुठल्याही पातळीवरील व कुठल्याही प्रकारचे अभाव, दैन्य व दुर्बलता दूर करण्याचा निश्चित मंगलदायी मार्ग आहे कारण त्रिविक्रम हा स्वत: ‘सगुण’ असून नव-अंकुर-ऐश्वर्यांनी खच्चून भरलेला आहे. हा त्रिविक्रम त्याच्या भक्तांना त्यांच्या त्रिविक्रमावरील श्रद्धेच्या व विश्वासाच्या चौपट फल देत राहतो’,. ‘हा त्रिविक्रम म्हणजे ह्या त्रिमितीतील (थ्री-डायमेन्शनल) जगात केवळ श्रद्धावानांसाठीच असणारा त्रिविध आधार आहे.’ असा उल्लेख तुलसीपत्र अग्रलेख क्र. ५२० मध्ये येतो.
अशा या भगवान त्रिविक्रमाच्या पूजनाची संधी या उत्सवात श्रद्धवानांना प्राप्त होते.
त्रिविक्रमाची उपासना अथवा पूजा ही केवळ ‘साकाराची’ किंवा पवित्र आकृतीची उपासना किंवा पूजा नाही, तर ती पवित्रतम व महादिव्य ‘सगुणाची’ उपासना आहे, गुणांची उपासना आहे. उत्सव स्थळावर त्रिविक्रम पूजनाच्या ठिकाणी मध्यभागी त्रिविक्रम लिंग असते, तर प्रत्येक पूजक श्रद्धवानासमोरील तबकात तीन पावले असतात. त्रिविक्रमाची ही तीन पावले म्हणजे अकारण कारुण्य, क्षमा व भक्तीचा स्वीकार. याच आपल्या तीन पावलांनी त्रिविक्रम नेहमी श्रद्धावानाच्या आयुष्यातील दुष्प्रारब्ध नष्ट करत असतो व श्रद्धवानाच्या जीवनात आनंद फुलवतो. या तबकातील तीन पावलांचे पूजन म्हणजे त्रिविक्रमाने आपल्या या पावलांनी आमचे जीवन व्यापावे, ही श्रद्धवानांनी केलेली त्रिविक्रमाला प्रार्थना.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा