शुक्रवार, २२ जून, २०१८

भक्तिस्तंभाभोवती प्रदक्षिणा


गुरुपौर्णिमा उत्सवातील हा एकमहत्त्वाचा भाग! मध्यभागी उभारलेल्या भक्तिस्तंभावर सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या ‘नित्यगुरुंच्या’ पादुका ठेवलेल्या असतात. तसेच अवधूतचिंतन उत्सवातील दोन अवधूतकुंभ सुद्धा ठेवलेले असतात. (https://avadhootchintanutsav.blogspot.in/)

रामनाम वहीच्या पानांच्या लगद्यापासून बनविलेल्या रामनाम इष्टिका आपल्या शिरावर घेऊन गजराच्या तालात भक्तिस्तंभाभोवती श्रद्धावानांना प्रदक्षिणा घालण्याची संधी मिळते, अर्थातच तेथील पवित्र स्पंदनांचा लाभ सर्व श्रद्धावानांना तेथे मिळतोच.

‘माझ्या सदगुरुभक्तीच्या इष्टिकेवर माझी सद्गुरुमाऊली उभी आहे आणि ही सद्गुरुभक्तीची इष्टिका शिरावर घेऊन मी सद्गुरुप्रदक्षिणा करत आहे, जेणेकरून सद्गुपरुरायाचे चरण माझ्या हृदयात कायमचे स्थानापन्न व्हावेत’ (कीजै नाथ हृदय महँ डेरा) हा भक्तिभाव धारण करून श्रद्धावान भक्तिस्तंभाभोवती प्रदक्षिणा घालतात.

‘माझ्या सदगुरुभक्तीच्या इष्टिकेवर माझी सद्गुरुमाऊली उभी आहे आणि ही सद्गुरुभक्तीची इष्टिका शिरावर घेऊन मी सद्गुरुप्रदक्षिणा करत आहे, जेणेकरून सद्‍गुरुरायाचे चरण माझ्या हृदयात कायमचे स्थानापन्न व्हावेत’ (कीजै नाथ हृदय महँ डेरा।) हा भक्तिभाव धारण करून श्रद्धावान भक्तिस्तंभाभोवती प्रदक्षिणा घालतात.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा